खंडाळा ! लोणंद येथे पत्रकारावर भ्याड हल्ला : पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद प्रतिनिधी, 
लोणंद येथील पत्रकार प्रशांत ढावरे यांच्यावर लोणंद येथील अवैध गुटखा विक्रेत्याने  भ्याड हल्ला केल्याची घटना घडली असून त्या विरोधात लोणंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
लोणंद येथील पत्रकार प्रशांत ढावरे हे खंडाळा साखर कारखान्यावर असलेल्या प्रेस कॉन्फरन्स साठी जाण्यासाठी आपल्या चारचाकी गाडीने निघताना त्यांच्या गाडीला गुटखा विक्रेता संदिप जयवंत खरात याने गाडी आडवी लावत थांबवण्यास भाग पाडत कारच्या दरवाजात दाबून मारहाण केली. तसेच कारसहीत पेटवून देण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी पत्रकार प्रशांत ढावरे हे पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता हा मागुन येत पोलिस ठाण्यातही  जीवे मारण्याची धमकी देत लोणंदमधे तुला पाय ठेवू देणार नाही अशी धमकी दिली. 

या संदर्भात लोणंद पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न केल्याने उद्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात येणार आहे .तसेच संघटनेच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.
To Top