सुर्या लॉजवरील छाप्यात सहा महिलांची सुटका : चार जणांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
राजेगाव : प्रतिनिधी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या खडकी गावच्या हद्दीतील सूर्या हॉटेलवर छापा टाकून ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली असून, चारजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
         शनिवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. रवीश शेट्टी (रा. सूर्या हॉटेल खडकी, ता. दौंड), सोनू, बब्बी शेठ, सुनील जामगे (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही)
अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. खडकी येथील सूर्या हॉटेल व लॉजिंगवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी या लॉजवर छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी सहा महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व स्वतःची उपजीविका चालविण्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले.
To Top