पुरंदर ! जेजुरी येथे बंदीस्तगटार योजना व रस्ता डांबरीकरण भूमिपूजन सोहळा संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कल्याणी जगताप : प्रतिनिधी

 पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील विद्यानगर येथील वार्ड क्रमांक ५ मध्ये दत्त मंदिर ते महेश म्हेत्रे घर रस्त्याचे डांबरीकरण व बंदिस्तगटर योजना कामाचे भूमिपूजन आज  पार पडले. 
           सदर रस्त्याचे काम व्हावे अशी अनेक वर्षापासून तेथील नागरिकांची मागणी होती व या मागणीचा विचार करून बर्‍याच वर्षांपासून रेंगाळलेल्या प्रश्न माजी नगरसेवक योगेश जगताप यांनी मार्गी लावल्याबद्दल तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विनाताई सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब दरेकर , अजिंक्य देशमुख, चव्हाण सर, तुकाराम काकडे ,भगत सर ,कोळी मॅडम, वैद्य सर, निलेश कुदळे ,विजय झगडे ,अनिकेत हरपळे, सुशील राऊत ,उद्योजक महेश म्हेत्रे, वैभव झगडे, किशोर भगत व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top