सोमेश्वर रिपोर्टर टीम--- --
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत आज मतदान प्रक्रिया पार पडत असून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी आपल्या मतदानाचा हक्क गट क्रमांक दोन मधील वाणेवाडी या ठिकाणी बजावला.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत २० जागांसाठी आज ४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. चार तालुक्यातील १५२ गावामधील ८३ मतदान केंद्रावर २५ हजार ५३५ मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.