सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांना आणि ऊस वाहतूक दारांना अडथळा आणणारी काटेरी झाडे-झुडपे भरपूर प्रमाणात वाढली आहेत. जवळपास दीड-दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. ही समस्या अपघातदृष्ट्या घातक आहे. त्यामुळे ही समस्या ऊसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच दूर व्हावी अशी होळ, सस्तेवाडी आणि सदोबाचीवाडी च्या शेतकऱ्यांची वारंवार मागणी होत होती. तरीही या समस्येचा आढावा घेऊन संभाजी होळकर आणि नवनिर्वाचित संचालक .प्रविण कांबळे यांनी समस्या दूर करण्यासाठी कारखान्याकडे JCB ची मागणी करून काम सुरू केले.
यावेळी होळ ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच .संतोष होळकर, माजी सरपंच .विठ्ठल वायाळ, निराधार योजना समितीचे सदस्य लालासाहेब होळकर, .यशवंत कांबळे,.गणपत गावडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.