ज्याला आमचे नेतृत्व मान्य नाही त्यांनी पक्षात राहू नये : उपमुख्यमंत्री अजित पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

शेतकऱ्यांना चिरडण्यापर्यंत केंद्राची मजल गेली असून यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांवर फक्त अन्यायच केला आहे. सोमवारी पुकारलेल्या बंदला सर्वांनी सहभागी व्हावे. सोमेश्वरने राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांचा दर दिला आहे. प्रपंचाशी निगडित प्रश्न असल्याने एकदिलाने काम करा. सर्वांना न्याय  देण्याची भूमिका असून येत्या निवडणुकीत  एवढी मते द्या की तुमच्या मतांच्या बोजाने मी वाकलो पाहिजे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 
             सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक प्रचाराची सांगता सभा सोमेश्वर पॅलेस येथे पार पडली त्यावेळी पवार बोलत होते. 

          यावेळी आ. संजय जगताप, माजी आ. अशोक टेकवडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर
 सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सभापती प्रमोद काकडे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश काकडे, सभापती निता फरांदे, ज्येष्ठ नेते विजयराव कोलते, बबुसाहेब माहुरकर, माणिकराव झेंडे, माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, विश्वासराव देवकाते, राजवर्धन शिंदे, शहाजीकाका काकडे, सचिन सातव, नंदुकाका जगताप, दिगंबर दुर्गाडे,  यांच्यासह सर्व उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की, सोमवारी होणाऱ्या संपात सर्वांनी सहभागी व्हावे.सध्या सोमेश्वर कारखाना सुस्थितीत आहे. पॅनेल करणे अवघड होते. प्रचाराला कमी कालावधी मिळाल्याने सर्वांची धावपळ झाली.नाराजांना यापुढील येणाऱ्या निवडणुकीत सामावून घेतले जाईल. सर्वांना न्याय देण्याची भूमिका असून काहींना सहकारतल काहीही कळत नाही. भीमा पाटस, खंडाळा, वाई, प्रतापगड या कारखान्यांची काय अवस्था झाली आहे याच्याकडे लक्ष द्यावे असेही पवार म्हणाले. सध्या चहा वाल्यांना चांगले दिवस असल्याचा चिमटाही पवार यांनी यावेळी काढला

        यावेळी आ. संजय जगताप, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.पुरुषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविक करत कारखान्याच्या प्रगतीचा आढवा घेतला. 
......................

वाघळवाडीकरांनी गावात  लावलेल्या काळे बॅनरचा अजित पवार यांनी आपल्या खास शब्दात समाचार घेतला.  काळे बॅनर लावलेले मला अजिबात आवडले नाही. कोणाला वेगळा पॅनेल करायचा असेल तर बिनदास्त कारावा परंतु माझी निंदा नालस्ती करू नये. सर्वाधिक निधी वाघळवाडीला दिला आहे. कारखान्याचा कर १० लाखांचा २० लाख केला. जेवायला बोलवायचे आणि अपमान करायचा. उमेदवारी दिली की अजित पवार चांगला नाही मिळाली की काळे बॅनर लावून निषेध करायचा हे कुठल्या संस्कृतीत बसते असा शब्दात अजित पवार यांनी वाघळवाडी ग्रामस्थांना खडे बोल सुनावले.

.........................
सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलायला उभे राहिले आणि मुसळधार पावसाने सुरुवात केली याचा धागा पकडत पवार म्हणाले हा शुभशकून असून साताऱ्यातील पावसाच्या सभेचा उल्लेख करत पवार साहेब पावसात भिजल्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले असल्याचे सांगितले. 
....................
बंद पडलेले  कारखाने भाजपच्या नेत्यांनी चालवायला घ्यावेत आणि मंग सहकाराच्या गप्पा माराव्यात.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मजबुतीने चालल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपच्या नेते मंडळींकडे जेवढे कारखाने आहेत त्यांच्याकडे पाचशे कोटी हजार कोटी असे कर्ज आहेत. सहकार म्हणजे काय ज्यांना अजून माहीत नाही अशांनी सहकारावर गप्पा मारू नये. मुंबईचा एक नेता येतो काहीही आरोप करतो. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दर दिला नसून जो दर बसला तोच दिला आहे.
पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष सोमेश्वर कारखाना.
.....................
अजित पवार बोलायला उभे राहिले आणि मुसळधार पावसाने सुरुवात केली याचा धागा पकडत पवार म्हणाले हा शुभशकून असून साताऱ्यात पावसात भिजल्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले.
.................
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुक प्रचाराच्या तोफा रविवारी(दि.१०) रोजी थंडावल्या. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रॅली, हलगीचा वाजवत, फटाक्यांची आतषबाजी करत, घोषणांचा पाऊस पाडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 
To Top