सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
कोणत्याही संवेदनशील माणसाला समाजाच्या व्यथा कायम समजत असतात. पदाधिकारी असूनदेखील पदाचा अविर्भाव न बाळगता कायम तळागाळातील लोकांसाठी काम करणारा माणूस...म्हणजे बारामती पंचायत समितीचे गटनेते प्रदीप उर्फ बापूराव धापटे....
त्याचा प्रत्यय आज नीरा-बारामती रस्त्यावर अनेकांनी अनुभवला. निरा बारामती रोडवर खामगळवाडी पाटी येथे पाईप लाईन साठी खनलेल्या खड्ड्यांमध्ये दुपारी एका दांपत्याचा अपघात झाला.. त्यावेळी बारामती वरून कोर्हाळ्याचे दिशेने पंचायत समिती सदस्य प्रदीप धापटे येत होते. त्यांनी अपघातग्रस्त दापंत्याना मदत केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेच्या विरोधात तक्रार करत बसण्यापेक्षा कोर्हाळे येथे येऊन, खोरे आणि घमेले घेऊन, खामगळपाटी येथील खड्डा, आणि कोर्हाळे गावाच्या बाहेर वीटभट्टी जवळ खड्डा स्वतः प्रदीप धापटे व त्यांचे साथीदार योगेश साळुंखे यांनी माती मुरूम टाकून बुजवला.
नीरा बारामती रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने अनेक वाहनांना अपघातात सामोरे जावे लागते. पंचायत समिती सदस्य प्रदीप धापटे यांच्या समोर आज अपघात झाला आणि त्यांनी कोणत्याही शासकीय स्तरावर फोन करत बसण्यापेक्षा स्वतः हातात खोरे आणि घमेले हातात घेत खड्डे बुजवले.