सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : प्रतिनिधी
शिवरे ता.भोर येथील सेल पंपाजवळून पुणे- सातारा महामार्ग ओलांडत असताना एका दाम्पत्यास पुण्याच्या दिशेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात पिकपकने धडक दिली.यावेळी जबर जखमी झालेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा उपचार अंती मृत्यू झाला तर ८० वर्षीय वृद्ध पुरुष जबर जखमी झाल्याने रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.वृद्ध दांपत्य यांचा मुलगा शशिकांत मधुकर शिंदे वय-५५, राहणार चिंचवड, पुणे, मुळगाव पाटखळ ता. जि. सातारा यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि. २९ सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान पुणे-सातारा रस्त्यावरील शिवरे गावच्या हद्दीत सेल पंपा जवळून वृद्ध दाम्पत्य रस्ता ओलांडत होते.यावेळी पुण्याच्या दिशेने भरधाव आलेल्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली.पिकअप वाहन घटनास्थळी न थांबता सातार्याच्या दिशेने पळून गेले.या अपघातात जबर मार लागल्याने उपचारअंती मुक्ताबाई मधुकर शिंदे वय -७५ यांचे निधन झाले. तर मधुकर वामन शिंदे वय- ८० हे जबर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत.
COMMENTS