वेल्हा ! 'या'नदीवरील पूल लवकरच होणार पूर्ण : ३ कोटींचा निधी मंजूर

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
अर्थसंकल्प मार्च २०२० मधील मंजूर केलेल्या वेल्हा तालुक्यातील बारागाव मावळ खो-यातील साखरगाव, चिरमोडी ,साखर ,निगडे ,कुजगाव प्रजिमा ४१ गुंजवणी धरण कानंदी नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकामासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने लवकरच कानंदी नदीवरील पुलाचे काम होणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी कामाच्या भूमिपूजन प्रसंगी सांगितले.
          भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यांचा विकास हाच ध्यास मनी धरून विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आमदार थोपटे विशेष प्रयत्न करून आणत असल्याने जनतेत आनंदाचे वातावरण आहे. याप्रसंगी वेल्हा तालुकाध्यक्ष नानासो राऊत, जि.प.सदस्य अमोल नलावडे,दिनकरराव धरपाळे,सभापती दिनकर सरपाले, उपसभापती अनंता दारवटकर,मा.सभापती सीमाताई राऊत, सदस्या संगीता जेधे, महिला अध्यक्षा आशाताई रेणुसे,मा.उपसभापती चंद्रकांत शेंडकर,राजगड संचालक डॉ.संभाजी मांगडे, संदीप नगिने,शोभाताई जाधव, यांचेसह चिरमोडी, मार्गासनी, साखर, गुंजवणी, फणशी गावचे सरपंच ,उपसरपंच, ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण वर्ग बहुसंखेने उपस्थित होते.

To Top