सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावच्या ग्रामसभेत काही विरोधकांनी राजकारण करत गोंधळ घातल्याने ग्रामसभा विस्कळीत झाली. अशी माहिती थोपटेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्याण गावडे यांनी दिली. थोपटेवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा काल शुक्रवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला सभा व्यवस्थित सुरू झाली, अजेंडा वरील जवळपास अकरा विषयाला मुद्देसूद चर्चा करून मंजुरी देण्यात आली. ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांना सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उत्तरे देत असताना विरोधकांनी मधेच दुसरे विषय काढून सभेत गोंधळ घातला. काही महाभागांनी तर ग्रामसभेत उपसरपंच त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असेही अकलेचे तारे तोडले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सविस्तर चाललेल्या ग्रामसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने ग्रामसेवकांनी व उपस्थित सर्वच ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
-------------------
अजिंठा वरील विषयावर चर्चा सुरू असताना व नागरिकांच्या उपस्थित प्रश्नाला सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक उत्तरे देत असताना विरोधकांनी मध्येच दुसरे विषय काढून गोंधळ घातला त्यामुळे ग्रामसभा विस्कळीत झाली.
रेखा बनकर
सरपंच(ग्रा. थोपटेवाडी)
--------------------------
मागील पाच वर्षात विरोधकांची सत्ता असताना दहा मिनिटात ग्रामसभा गुंडाळली जात होती. आमच्या सत्तेच्या काळात पहिल्या ग्रामसभेतच अनेक मुद्यांवर सखोल चर्चा झाली. मात्र गोंधळ घालण्याच्या उद्देशाने आलेल्या विरोधकांनी अजिंठा वरील विषयावर चर्चा न करता मधेच दुसरे विषय काढत अरेरावी केल्याने ग्रामसभा विस्कळीत झाली.
कल्याण गावडे
उपसरपंच(ग्रा. थोपटेवाडी)
-------------------------
ग्रामसभेत अजिंठा वरील विषयावर सविस्तर चर्चा सुरू असताना काही ग्रामस्थांनी मधेच दुसरे विषय काढले व गोंधळ घातला. वास्तविक अजिंठा वरील सर्व विषय संपल्यानंतर दुसरे विषय हे अध्यक्षांच्या परवानगीने घेणे गरजेचे होते. मात्र तसे न करता काही नागरिकांनी दुसरे विषय काढून गोंधळ घातला व सभा विस्कळीत केली.
शिंदे (ग्रामसेवक, थोपटेवाडी)
COMMENTS