सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
चौधरवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिर समितीने नवरात्र उस्तवामध्ये पंच क्रोशीतील लोकांना देवीच्या मंदिराच्या जीर्णोधर व सुशोभीकरणासाठी
आर्थिक मदतीतीचे आवाहन केले होते. शुक्रवार दि.29/10/21 रोजी चौधरवाडी येथील पवार कुटुंबीयामधील श्री महेश किसन पवार, माणिक किसन पवार व दिलीप किसन पवार व श्रीमती सुमन निळकंठ गुंजवटे आणि श्रीमती चतुरा प्रल्हाद चव्हाण यांच्या मातोश्री कै. शकुंतला किसनराव पवार यांच्या तेरावा च्या कार्यक्रमा निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता या किर्तन समारोप प्रसंगी कै.किसनराव रामभाऊ पवार व कै.शकुंतला किसनराव पवार यांचे स्मरणार्थ वरील तिन्हीही बंधू व दोघीबहिणी यांनी एकत्रित विचार करून सामाजिक व धार्मिक जाणीवेतून आईचे बँक खातेवर असणारी सर्व रक्कम व स्वतःकडील काही रक्कम त्यामध्ये टाकून सर्व मिळून 90,000/ रुपये तुळजाभवानीमाता मंदिराचे जीर्णोधर कामास मदत म्हणून मंदिर समितीचे पदाधिकारी श्री.पोपटराव नारायणराव पवार,श्री.शशांक वसंतराव पवार,ऋषिकेश दिलीप पवार व चौधरवाडी गावचे पोलीस पाटील श्री.राजकुमार नामदेवराव शिंदे यांचेकडे रोख रक्कम देणगी सुपूर्त केली.याप्रसंगी कीर्तनकार ह.भ.प.श्री.रामभाऊ शिंदे महाराज,व त्यांचे सर्व सहकारी आणि गावातील ह.भ.प.श्री.विकास महाराज (पवार सर),ह.भ.प.श्री.सुरेश पवार महाराज इतर मान्यवर श्रोते उपस्थित होते.यावेळी मंदिर समितीतर्फे श्री.शशांक पवार यांनी पवार कुटुंबियांचे आभार मानले तसेच चौधरवाडीतील व पंच क्रोशीतील सर्व भवानीमाता भाविक भक्तांना मंदिराचे जीर्णोधरासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. पुढील काळात भवानीमाता मंदिराचे जीर्णोधरासाठी ट्रस्ट स्थापन करून मंदिर,व परिसराचा विकासआणि समाज उपोयोगी कामे केली जातील असे विचार मांडले.तसेच सध्या मंदिर समितीतर्फे चालू असलेल्या कामाचा आढावा श्री.ऋषिकेश दिलीप पवार यांनी मांडला.
COMMENTS