राज्यात कोविड लसीकरणाबाबत पुणे जिल्हा आघाडीवर : प्रमोद काकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

कोविडच्या महामारीत जिल्हा आरोग्य यंत्रणेने केलेले काम कौस्तुकपद असून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण पूर्ण झालेला पुणे जिल्हा ठरला असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी व्यक्त केले. 
            सोमेश्वरनगर ता बारामती येथे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळात राष्ट्रीय सेवा योजना व प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या युवा स्वास्थ् लसीकरण मोहिमेत ते बोलत होते. यावेळी सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे, संचालक लालासाहेब नलवडे, अभिजित काकडे, प्राचार्य एस के हजारे, प्राचार्य धनंजय बनसोडे, आनंदराव खलाटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पुरुषोत्तम जगताप म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती व आरोग्य विभाग यांनी जास्तीत जास्त लस लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे कोविड च्या महामारीत त्यांनी केलेले काम कौस्तुकपद आहे. नुकताच शाळा महाविद्यालयात सुरू करण्याची घोषणा शासनाने केली आहे मात्र दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे त्यामुळे युवा स्वस्थ लसीकरणाच्या माध्यमातून हे लसीकरण करण्यात येणार आहे.
            सदरच्या कार्यक्रमामध्ये एकुण  41 विद्यार्थ्यांचे लसीकरण यशस्वीरीत्या करण्यात आले.
कॉलेज व परीसरातील सर्व विद्यार्थ्यांनी शंभर टक्के लसीकरण करण्याचे आव्हान  प्रमोद काकडे  व  पुरुषोत्तम जगताप यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्याकरीता लसीकरण मोहीम समन्वयक प्रा. माधुरी भांडवलकर, विद्यार्थी कल्याण अधीकारी प्रा. संतोष पिंगळे, प्रा. राजेश निकाळजे,प्रा. प्रतिक्षा मोरे , प्रा.श्रद्घा जगताप, प्रा. नवनाथ भोंग, जितेंद्र जगताप, प्रा. किशोर साळुंके, प्रा. जयश्री भोसले,प्रा. पाचुकांत होळकर, संदिप जगदाळे, अमित काकडे, प्रा.अपुर्वा ताम्हाणे इ. यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मयुरी यादव व प्रा. चंद्रशेखर भोसले यांनी केले.

To Top