सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली असून दि ८ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या सर्व निवडीचा अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे राखून ठेवला असून नक्की कोणाला संधी मिळणार ही बाब अजून गुलदस्त्यात आहे. दि ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे, मिलिंद टांकसाळे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता ही निवड पार पडणार आहे.