'सोमेश्वर'च्या स्वीकृत संचालकपदी अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधित्व मिळावे : नासिर इनामदार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

नुकतीच श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्री सोमेश्वर विकास पॅनलने दैदिप्यमान आणि ऐतिहासिक विजय मिळवला. यानिमित्ताने सर्वच विजयी संचालक मंडळाचे हार्दिक अभिनंदन तसेच ज्या सभासदांनी हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
           वास्तविक पाहता सन 1992 पासूनच लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तसेच आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा उत्कर्ष अतिशय उत्तम रीतीने चालू आहे. या अतिशय महत्त्वाच्या संस्थेवर आत्तापर्यंत अनेक लोकांना संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली परंतु मुस्लिम समाजाला आज तागायत या ठिकाणी कधीही संधी मिळालेली नाही. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या चारही तालुक्यामध्ये म्हणजेच बारामती फलटण खंडाळा आणि पुरंदर तालुक्यातील जवळपास प्रत्येकच गावांमध्ये मुस्लिम समाजाच्या शेतकरी सभासदांची संख्या आहे व संपूर्ण समाज नेहमीच आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब अजितदादा पवार व सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत प्रामाणिकपणे पक्षासोबत असतो. पक्ष नेतृत्वाची देखील समाजाला नेहमीच सन्मानपूर्वक न्याय देण्याची भूमिका असते. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ती स्वीकृत संचालक म्हणून दोन जागा आहेत त्यापैकी एका जागेवरती मुस्लिम समाजाच्या सभासदाची नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस श्री नासिर इनामदार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

तसेच येणाऱ्या आठवड्यामध्ये या मागणीच्या संबंधाने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री सोहेल खान व बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री इम्तियाज भाई शिकलकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामधील समाजाच्या प्रमुख लोकांचे एक शिष्टमंडळ आदरणीय अजितदादांना भेटून यासंबंधीची न्याय मागणी करणार आहेत असेही नासिर इनामदार यांनी कळवले आहे.
          आदरणीय अजितदादा देखील या न्याय मागणीचा सकारात्मक विचार करुन  श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व देऊन ऐतिहासिक निर्णय घेतील व न्याय मिळवून देतील हा विश्वास श्री नासिर इनामदार यांनी व्यक्त केला आहे
To Top