सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
गेल्या काही दिवसांपासून शिंदेवाडी ता.भोर चौकीच्या हद्दीत सर्रास अवैध धंद्यांना उत आला असून याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. तर पोलीस सोईस्करपणे अवैध धंद्यांकडे कानाडोळा करत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
राजगड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शिंदेवाडी पोलिस चौकी आहे.पुणे-सातारा महामार्गलगतची भोर तालुक्यातील अनेक गावे या शिंदेवाडी चौकीच्या हद्दीत येतात.मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेवाडी पोलिस चौकीच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावात अवैध धंदे राजरोसपणे फोफावले आहेत. यामुळे मद्यधुंद तळीरामांचे अड्डे तयार होऊन वादीवाद तसेच हनामारीला निमंत्रण दिले जात आहे.पोलीस यंत्रणेने अवैधधंदे लवकरात लवकर बंद करावेत अशी मागणी परिसरातील त्रस्त नागरिकांकडून होत आहे.
त्वरित अवैध धंद्यांवर कारवाई करू--------
शिंदेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे ताबडतोब शोधून काढून त्वरित कडक कारवाई करू असे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी यांनी सांगितले.