पुरंदर ! सासवड नजीक झेंडेवाडी येथे बारामती स्वारगेट शिवशाही बस फोडली : चालक जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सासवड : प्रतिनिधी
पुणे ते पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवेघाट दरम्यान झेंडेवाडी (ता पुरंदर) येथे शिवशाही एसटी बसवर आरोपी अज्ञात दोन इसमानी दगडफेक करुन एसटीची पुढची काच फोडली आसल्याची फिर्याद विष्णु संभाजी अवघडे (वय ४१ व्यवसाय नोकरी (चालक) रा.झारगडवाडी ता.बारमती जि.पुणे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दि.२८ रोजी १२:०० वा.चे सुमारस मी माझे ताब्यातील शिवशाही बस क्र.MH 18 BG1509 ही बारामती येथुन पुणे स्वारगेट येथे घेवुन जात असताना झेंडेवाडी ता.पुरंदर जि.पुणे येथे पालखी विसाव्याच्या जवळ अज्ञात एका इसमाने बसच्या समोरील काचेवर दगड मारला व दोघेजण झेंडेवाडीचे दिशेने गाडीवर बसुन निघुन गेले. दगड समोरून काचेवर लागल्याने काच फुटुन माझे डोक्यास दगड व काचा लागुन दुखापत झाली आहे. म्हणुन माझी अज्ञात दोन इसमांविरूध्द तक्रार आहे. पुढील तपास सासवड पोलीस. स्टेशन चे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप करीत आहेत
To Top