भोर ! राजगड कारखाना करणार ३ लाख टन उसाचे गाळप : आमंदार संग्राम थोपटे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
राजगड सहकारी साखर कारखाना या गंळीत हंगामात ३ लाख मेट्रीक टनापेक्षा जास्त ऊसाचे गाळप करण्याचा  निर्धार असल्याने कारखान्याच्या पुढील अडचणी कमी होणार आहेत.असा विश्वास अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी गाळप शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केला.

     राजगडचा बाँयलर अग्नि प्रदीपन व मोळी पुजनाचा कार्यक्रम कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि-२८ पार पडला.यावेळी कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी यांच्या शुभहस्ते मोळी पुजन करण्यात आले.यावेळी सातारा जि. प. माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे,वेल्हेचे सभापती दिनकर सरपाले,जि.प.सदस्य दिनकर धरपाळे,विठ्ठल आवाळे,भोर पं.स. सदस्य रोहन बाठे,संचालक कृष्णाजी शिनगारे,उपाध्यक्ष विकास कोंडे,संचालक उत्तम थोपटे तसेच कारखान्याचे सर्व संचालक व शेतकरी उपस्थित होते.

     संग्राम थोपटे पुढे म्हणाले राज्य सरकारने कर्जाची हमी घेतल्याने कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध झाले.त्यामुळे कारखाना चालु होत आहे सर्वात अधी शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी एफ.आर.पीची रक्कम खात्यावर अदा केली असुन दिवाळी अगोदर कामगारांचे थकीत पगार व बोनस दिला जाणार आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजु शेटे यांनी केले तर अभार संचालक पोपटराव सुके यांनी मानले.
To Top