सोमेश्वर रिपोर्टर टीम------
डोर्लेवाडी ( ता.बारामती ) बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे २७ ऑक्टोबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी आयोजन करण्यात आले या ग्रामसभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते बापूराव निलाखे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सुभाष नाळे यांची निवड करण्यात आली डोर्लेवाडी येथील सरपंच पांडुरंग सलवदे यांच्या अध्यक्षतेखाली तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवड बाबत विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती.यावेळी एकूण बारा उमेदवारांनी अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केले होते परंतु आकरा उमेदवारांनी आपली अर्ज परत घेऊन ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते बापूराव निलाखे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामविकास अधिकारी आर.टी.कारंडे , उपसरपंच शहाजी दळवी , माजी तंटामुक्ती अध्यक्ष मिलिंद भोपळे,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काळोखे,रामभाऊ कालगावकर,रामभाऊ बनकर,दादा दळवी,पंचायत समिती माजी सभापती अशोक नवले,छत्रपती भवानीनगर कारखाना माजी संचालक रमेशराव मोरे,विनोद नवले अविनाश काळकुटे,दादा नवले,यांच्या सह आदी पदाधिकारी व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्व नियमांचे पालन करून तंटामुक्ती अध्यक्ष पदाची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती २७ ऑक्टोबर रोजी देण्यात आली