सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा -बारामती रस्त्याचे मागील दीड महिन्यांपासून करंजेपूल ते वाघळवाडी रस्त्याचे रुंदीकरण व साईडपट्ट्या भरण्याचे काम चालू असून ते अतिशय संथगतीने चालू आहे ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा एकाचवेळेस बाजू खोदले गेले आहे खोदलेल्या रस्त्याचा राडारोडा त्याचबरोबर खुदाई केल्यानंतर रस्ता तयार करण्यासाठी टाकण्यात येणारा भराव हा मुख्य रस्त्याच्या कडेला पडलेला आहे, त्यावर टाकण्यात येणारी बारीक खडी हेही मुख्य रस्त्याच्या बाजूला पडली आहे. त्यामुळे प्रवाशांना येथून प्रवास करणे ही तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील दीड महिन्यांपासून इथे अनेक अपघात घडले आहेत वाहनांचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे .
मागील दीड महिन्यांपासून संथगतीने चाललेल्या या कामामुळे स्थानिक नागरिक व प्रवासी त्रस्त झाले आहेत .वास्तविक पाहता रस्त्याच्या दुतर्फा एकाच वेळेस काम करता येत नाही प्रमथा रस्त्याची कोणती ही एक बाजू पूर्ण करणे गरजेचे असते त्यानंतर रस्त्याची दुसरी बाजूचे काम सुरवात करावयाची असते पण संबंधित ठेकेदाराला आपल्या मर्जीनुसार काम करत असून या कामास विलंब होत.या रस्त्यासाठी वापरला जाणारा मुरूम हा मातीमिश्रित आहे हा चांगल्या प्रतीचा वापरला जात नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे .
शाळा व महाविद्यालय पूर्ण क्षमतेने चालू झाले असून रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होत आहे ,काही दिवसांतच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा हंगाम पूर्ण क्षमतेने चालू होणार असून या रस्त्यावर ती ऊस वाहतूक होणार आहे .त्यामुळे अति वर्दळीच्या मानल्या जाणार्या ह्या रस्त्याचे काम संथगतीने न होता ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रवासी व स्थानिक नागरिक आग्रही आहेत