सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी बाबत आज मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखती घेतल्या नंतर मेळाव्यात बोलतेवेळी आज उमेदवारांची नावे जाहीर करण्याचे जाहीर केले आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज मोठ्या हालचाली होणाच्या शक्यता आहेत. काल अजित पवार यांनी तिकीट मिळाले नाहीतर रुसू नका वेगवेगळ्या ठिकाणी संधी देता येतील असे सांगितले तसेच कोणाला फोन करणार नाही असे सांगून मतदान केंद्रावर होणाऱ्या मतदान आकड्यावर लक्ष रहाणार असल्याचे सांगितल्याने कोणी पक्षाचे काम केले हे समजणार आहेत. हे सांगून हवा काढून घेतली आहे.
कालच्या मुलाखती आणि झालेला मेळावा यानंतर उमेदवारी जाहीर होण्याची हुरहूर उमेदवाराना लागली आहे. यातच मुलाखती सुरू असतानाच शेतकरी संघटनेचा एक प्रतिनिधी अजित पवार यांच्याशी बोलून गेले असल्याचे सूत्रां कडून समजले. याबाबत अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात मागणी जास्त असून इतकी मागणी पुरी करणे अशक्य असल्याचे बोलुन दाखविले. त्यामुळे किती उमेदवारांना संधी मिळते हे यादी प्रसिद्ध होता क्षणी समजेल.
भाजप कडून बैठका पार पडल्यानंतर पुन्हा भाजपच्या कार्यकर्त्याच्या गोटात शांतता पसरली.पक्ष श्रेष्टीकडून म्हणावी इतकी ताकद मिळत नसल्याचे आणि भाजपच्या नेत्यांकडून याबाबत कोणीही सोमेश्वर च्या निवडणूकीबाबत पुढे आल्याचे दिसून आले नाही.चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर मध्ये राष्ट्रवादी चा सभासद दौरा पूर्ण होत आला परंतु भाजपची अद्याप उमेदवार यादी प्रसिद्ध झाली नसल्याने पॅनेल होणार की एकादा-दुसरा उमेदवार घुसविण्यासाठी प्रयत्न होणार हे पहावे लागणार आहे.
उमेदवारी अर्ज भरल्यापासून कालच्या मुलाखती होइपर्यंत अनेकांच्या भेटी गाठी आणि शिफारस पत्र यांची जुळवाजुळव करण्यात उमेदवार सक्रिय होते. परंतु आज यादी कधी फायनल होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
एकंदरीत राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याने त्यात शेतकरी संघटना पॅनेल करणार नसल्याने परंतु भाजपने अजून पॅनेल जाहीर केला नसल्यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा कारखाना परिसरात सुरू आहे. याबाबत उद्या चित्र स्पष्ट होईल.
COMMENTS