सोमेश्वर रिपोर्टर टीम---
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवार घोषित करण्याचे काम सुरू आहे. महाविकस आघाडीत शिवसेना हा एक घटक पक्ष आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्याला शिवसेनेच्या उमेदवाराला संधी मिळावी अशी मागणी शिवसेनेच्या वरिष्ठांकडे केली असल्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.
ते 'सोमेश्वर रिपोर्टर' शी बोलत होते. ते म्हणाले पुरंदरच्या नाझरे कप. नाझरे सूप,जेऊर, मांडकी, वीर,परींचे, माहूर या भागातून उसाचे क्षेत्र अधिक आहे. मतदार ही जास्त आहेत. या ठिकाणी एक ते दोन शिवसेनेच्या उमेदवारांना संधी मिळाली अशी मागणी मी शिवसेनेच्या वरिष्ठांकडे केली आहे. राज्यात तीन घटक पक्षांचे सरकार असल्याने पुरंदर मधून शिवसेनेच्या उमेदवारांना संधी मिळणे अपेक्षित आहे.जरी संधी नाही मिळाली उमेदवारी अर्ज मागे घेणार आहोत मात्र कारखाना निवडणुकीत कदापि भाजपा सोबत जाणार नसल्याचे मा. राज्यमंत्री शिवतारे यांनी सांगितले.