सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
डोर्लेवाडी : प्रतिनिधी
आरोग्य केंद्रातील सेवेबाबत तसेच नुकत्याच झालेल्या लसीकरणाच्या संदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. याचे वास्तव चित्र येथील एका दैनिकाच्या पत्रकाराने मांडले होते. या बातमीच्या माध्यमातून वास्तव चित्र मांडल्यामुळे डोर्लेवाडी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी वैशाली देवकाते यांनी पत्रकाराला धमकावले. तसेच सदर पत्रकाराला अश्लील भाषा वापरली होती. याप्रकरणी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेने वैद्यकीय अधिकारी वैशाली देवकाते यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
त्यानुसार बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेने आरोग्य विभागाला एक निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार पंचायत समितीच्या तालुका अधिकाऱ्यांनी झालेल्या घटनेबाबत लेखी अहवाल डोर्लेवाडीच्या वैद्यकीय अधिकारी वैशाली देवकाते यांनी कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार हे आपले कार्य पार पाडत असतात परंतु अशा प्रकारे बातम्या प्रकाशित केल्यामुळे याचा इतर पत्रकारांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. पत्रकारांना धमकावणे, शिव्या देणे अशा प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशा चुकीच्या पद्धतीने लसीकरण होत असताना वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात गोरख जाधव डोर्लेवाडी लोकमत पत्रकार यांच्यावर त्या अधिकाऱ्यांनी धमकावून व असशील भाषा वापरल्यामुळे याचा निषेध व्यक्त करत बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ यांनी तालुका आरोग्य अधिकारी बारामती व गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मोरे, उपाध्यक्ष युवराज खोमणे, सचिव चिंतामणी क्षीरसागर, पत्रकार सोमनाथ भिले, मंगेश कचरे, नविद पठाण, सोमनाथ कदम, आदी पत्रकारांच्या स्वाक्षर्या आहेत.