सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., या कारखान्याचा सन २०२१-२०२२ या गळीत हंगामाचा ६० वा गव्हाण पूजन समारंभ व गळीत हंगाम शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभहस्ते शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोंबर, २०२१ रोजी सकाळी १० वा. २५ मिनीटे या शुभमुहूर्तावर संपन्न होणार आहे.
चालू गळीत हंगामात सोमेश्वर च्या कार्यक्षेत्र अतिरिक्त उसाचे संकट असून नोंदीचा ३७ हजार एकरावरील तर बिगर नोंदीचा पाच हजार एकरावरील असा ४२ हजार एकरातील तब्बल सोळा ते साडेसोळा लाख टन ऊस गळपासाठी उपलब्ध आहे. कारखान्याचे विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारी महिन्यात ते पूर्ण होईल. उपलब्ध ऊस जादा असल्याने शेजारील दौड शुगर, बारामती ऍग्रो, शरयू साखर, साखरवाडी दत्त शुगर या करखान्यांशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.