सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : प्रतिनिधी
नाझरे क प गावचि सभासद संख्या ४३६ असुन सलग २५ वर्षे गावाला डावलले गेले कदाचित दादांनी मुलाखती घेतल्या असत्या तर सभासदांना आपली व्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर मांडता आली असती अशी खंत पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संदीप चिकने यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील स्थानिक पुढाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ साध्य करत नाझरे क प गावाचा 25 वर्ष सूडबुद्धीने द्वेश करत उमेदवारी डावलण्याचा प्रयत्न केला आहे या उलट नाझरे सुपे ची सभासद संख्या 266 असून सुद्धा सलग तीन पंचवार्षिक त्या गावाला उमेदवारी देण्याचा घाट स्थानिक पुढाऱ्यांनी त्याठिकाणी केला आहे या सर्व गोष्टी गावा बाबत जरी झाले असतील तरी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सभासद नाझरे कप यांना मी विनंती करीत आहे आपल्या गावाला उमेदवारी मिळाली नसेल तरी नाराज होऊ नका उमेदवारी मिळवून न देणारे स्वतःला आनंद मिळवण्यासाठी गावाचा द्वेष करतात वेळ आल्यावर त्यांचा हिशोब व्यवस्थित पूर्ण करू या सर्व गोष्टी विसरून कामाला लागा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आपण कार्यकर्ते आहोत गावातून 100 टक्के मतदान अजितदादांनी उभे केलेल्या पॅनेलला झाले पाहिजे अशी विनंती करीत आहे. माजी कृषीमंत्री शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचाराने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे इथून पुढच्या काळात राष्ट्रवादी विचाराने काम करणार असल्याबाबत ची भूमिका संदीप चिकणे यांनी सांगितले.