सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मु. सा. काकडे महाविद्यालयातील महिला सबलीकरण व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रवीवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने युवकांसमोरील आरोग्यविषयक असलेल्या समस्या जाणून घेऊन त्या कमी करण्यासाठी *आरोग्य व रक्तक्षय* या विषयावर ऑनलाईन जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अलकनंदा गणेश जगताप या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी सर यांनी भूषवले, यानंतर प्राचार्य यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून आरोग्य जागर या कार्यक्रमांची युवक व युवतींसाठी किती गरज आहे तसेच हृदय व रक्तवाहिन्या याविषयी मौलिक मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे सचिव प्राध्यापक जयवंतराव घोरपडे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. अलकनंदा जगताप मॅडम यांनी रक्तक्षय म्हणजे काय त्याची लक्षणे कशी ओळखावी व तो कसा दूर करता येईल यासाठीच्या उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले, तसेच दररोजच्या जेवणामध्ये कोणत्या प्रकारच्या आहाराचा समावेश असावा हे स्पष्ट केले. महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या उपप्राचार्य मेघा जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच बीबीए (सी.ए) विभागाच्या प्राध्यापक चेतना तावरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला सबलीकरण समितीच्या समन्वयक डॉ. रेश्मा पठाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे सर, सहसचिव व महिला सबलीकरण समिती सदस्य सतिश लकडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली, त्याच बरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. प्रविण ताटे देशमुख, प्रा. रजनीकांत गायकवाड, प्रा. मेघा जगताप, IQAC चे समन्वयक डॉ. जाधव सर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.
महिला सबलीकरण समितीतील सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनींनी ऑनलाइन सहभाग नोंदवला.