सोमेश्वर रिपोर्टर टीम
नाशिक :
पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला २५ कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे १०० कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे समजते.
केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील ६ कांदा व्यापाऱ्यांवर गुरुवारी १३ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली. हा पैसा मोजण्यासाठी तब्बल ऐंशी अधिकारी होते. त्यांनी नाशिक, पिंपळगावमधील बँकामध्ये जवळपास अठरा तास रोकड मोजली. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यभरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनेक व्यापारी आणि राजकीय नेत्यांंनीही या कारवाईवर आक्षेप घेत कारवाईसाठी निवडलेली वेळ चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
COMMENTS