सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
खंडाळा : प्रतिनिधी
खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत . " खंडाळा साखर कारखाना निवडणुकीत वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्या गटाची आणि माजी आमदार मदन भोसले यांची समोरासमोर लढत होत आहे .
या लढतीमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या गटाने संस्थापक पॅनलला मोठा दणका दिलेला आहे . आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत संस्थापक पॅनेलचे अनुसूचित जाती जमातीचे अधिकृत उमेदवार भरत एकनाथ जाधव यांनी राष्ट्रवादी प्रणित परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा दिला आहे . संस्थापक पॅनलच्या अधिकृत उमेदवारानेच आमदार मकरंद पाटील गटाला पाठिंबा दिल्याने आमदार मकरंद आबा यांच्या गटाची कारखान्यावरील पकड मजबूत होताना दिसत आहे .