सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
उंडवडी : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपूर्वी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मॅकडॉल कंपनीमधुन दारुचे बॉक्सचा ६५ लाख ८७ हजारांचा माल घेऊन जात असताना
उंडवडी कडेपठार या ठिकाणी अपघाताचा बनाव करून
नंदकुमार क्षिरसागर (रा. गोतोंडी,ता.इंदापुर,जि.पुणे) याच्या मदतीने ट्रकमधील दारुचे ५०० बॉक्स असा ४० लाखांचा माल एका गोडाऊन मध्ये ठेवणाऱ्या चालक अंकुश बेंद्रे (रा.बारामती, ता.बारामती ) व मालक अजिनाथ जराड (रा.बारामती) दोघांविरोधात अपघाताचा बनाव करत
अपहार केल्याचा गुन्हा तालुका पोलिसांनी दाखल केला आला आहे.
ब बाबाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दोन
दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील उंडवडी येथे दारू वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती,या अनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले होते,उंडवडी येथे घडलेल्या अपघाताची माहिती घेतली असता,चालकाला विचारलेल्या प्रश्नांवरून संशय निर्माण झाल्याने गुन्हे शोध पथकाने ट्रक कंपनी मधून निघाल्यापासून रोडचे
सीसीटीव्ही फुटेज तपासली असता,ट्रक हा पहिल्यांदा भवानीनगर या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले.त्यावरून गुन्हे शोध पथकाने कसून चौकशी केली असता,फिर्यादींनी स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी अपघाताचा बनाव
करत,त्याचा मित्र नंदकुमार क्षीरसागर (रा.गोतोंडी, ता.इंदापूर,जि.पुणे) याच्या गोडाऊन मध्ये तब्बल ५०० दारूचे बॉक्स असा ४० लाखांचा माल ठेवण्यात आला,आणि उंडवडी मधून जात असताना ट्रॅकला अपघात झाला असे भासवण्याकरीता ट्रॅक पलटी करून
गावातील लोकांनी दारूंचा मुद्देमाल उचलून नेल्याची फिर्याद दिली होती.
गुन्हे शोध पथकाने सखोल तपास करत, अपहार केलेला ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असुन,या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली आहे.ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,तालुका पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक
खरात,गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे,नंदू जाधव,विजय वाघमोडे,विनोद लोंखंडे, सदाशिव बंडगर अनिकेत शेळके यांनी केली आहे.
COMMENTS