सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर-प्रतिनिधी
भोर तालुक्यातील शिवसैनिक शिवसेना पक्षाचे काम जोमाने करीत आले आहेत.या निष्ठावंत शिवसैनिकांवर भविष्य काळात मानाचे स्थान देणार अडून अन्याय होऊ देणार नाही.अशी ग्वाही शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी दिली.
खेडशिवापूर येथे भोर,वेल्हा, खडकवासला शिवसेना कार्यकर्ता मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी ते बोलत होते .सचिन अहिर पुढे म्हणाले या पंचवार्षिकमध्ये सत्ता स्थापन झाल्यापासून अतिवृष्टी,चक्रीवादळ तसेच कोरोना सारखी भयानक अशी नैसर्गिक संकटे राज्यावर आली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तम कामगिरी करून व्यवस्थापन योग्य प्रकारे केले. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे त्यांनी कौतुक केले.तसेच भविष्यात गड किल्ले यांचे संरक्षण करणार असून जिल्हा परिषदेला निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही सचिन अहिर यांनी दिली.
यावेळी संपर्क संघटिका महिला आघाडी शालिनी देशपांडे,जिल्हा प्रमुख रमेश कोंडे ,बाळासाहेब चांदेरे सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे ,गजानन थरकुटे, अविनाश बलकवडे ,अमोल पांगारे ,बुवा खाटपे दत्तात्रय देशमाने , माऊली शिंदे ,जी.प.सदस्य, शलाका कोंडे ,पं. स.सदस्य पुनम पांगारे, निशाताई सपकाळ , पुजा रावेतकर, नितीन वाघ, नितीन सोनवले, युवराज जेधे, केदार देशपांडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.