सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पुणे : प्रतिनिधी
शहरात सुरू झालेले खून सत्र थांबत नसून, व्याजाच्या पैश्यातून तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्री घडला आहे. भारती विद्यापीठ परिसरात ही घटना घडली आहे. दोघे पसार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. शरद आवारे (वय 27) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आवारे हा लोन करून देण्याची कामे करत होता. यादरम्यान या दोघांचा व्याजाच्या पैशांचा व्यवहार होता. त्यातील 3 महिन्यांचे हप्ते दिले होते. मात्र एक हप्ता राहिला होता. त्यातून त्यांची भांडणे झाली होती.
मध्यरात्री कात्रज-नवले ब्रिज रस्त्यावर आंबेगाव परिसरातील एका शोरूम येथे गाठून तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वारकरून शरद याचा दोघांनी खून केला. त्यानंतर ते पसार झाले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. काही वेळाने ही माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर व त्यांच्या पथकाने धाव घेतली. माहिती घेतल्यानंतर प्रकाश शिंदे आणि जितेंद्र पाटोळे यांनी हा खून केल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार त्याचा शोध घेतला जात आहे, असे सांगण्यात आले आहे.
COMMENTS