मोठी बातमी ! अकरा वर्षाच्या मुलाचा देवी बरोबर लावण्यात येणारा विवाह पोलीसांच्या मदतीने थांबण्यात अंनिसला यश : बारामती तालुक्यातील गुणवडी येथील प्रकार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील गुणवडी या गावातील एक अकरा वर्षाच्या मुलाच्या देवीबरोबर लावण्यात येणारा विवाह बारामती पोलिसांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने समुपदेशन करून थांबवला. 
               सविस्तर हकीकत अशी, याबाबत नंदिनी जाधव सांगतात की, एका व्हॉट्सअप ग्रुप वर नंदिनी जाधव यांना पोतराजच्या ११ वर्षाच्या मुलांचा गेनमाळ बांधण्याचा  कार्यक्रम आज दि २८ रोजी होणार  या कार्यक्रमाची पत्रिका पाहण्यात आली. देवदासी  विषयी काम करत असल्यामूळे गेनमाळ म्हणजे देवीबरोबर लग्न लावणे हे माहीत असल्यामुळे तसेच  एखाद्या महिलेला मुल होत नाही तेव्हा ते देवीला नवस बोलतात  मुल होईल ते तुला अर्पण करीन.अशा मुला मुलीचा विवाह देवी बरोबर लावुन त्यांना देवीला सोडले जाते. एका छोट्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न होता.
    बारामतीला फोन करून याबाबत संपुर्ण माहीती घेतली असता दि. २३ ला या मुलाचा हळदीचा कार्यक्रम झाला होता.त्या फोटो मिळण्याचा प्रयत्न करून हळदी लावतानाचे फोटो मिळवले. प्रथा परंपराच्या अंधश्रद्धेच्या भीतीपोटी अल्पवयीन मुला मुली अवैज्ञानिक विधी करण्यास भाग पाडत आहेत.यामध्ये अनेक बालकांचे शोषण होत आहे हे थांबवण्यासाठी कायद्या बरोबर या अशिक्षित लोकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. मनात ठरवले होते की,काहीही झाले तरी या मुलाला  तसेच या कुटुंबाचे प्रबोधन करून यातुन बाहेर काढायचे ठरवले.
  याबाबतची  पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक  अभिनव देशमुख यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपण शनिवारीच याबाबत कारवाई करू त्याआधी त्याचे समुपदेशन करू असेही सांगितले.तशी माहीती अभिनव देशमुख यांनी बारामती शहर पो.स्टेशनचे PI महाडिक याबाबत माहीती दिली. CWCचे बाल जिल्हा संरक्षण अधिकारी परमानंद यांना याबाबत माहीती दिली.त्यांनीही लगेच पोलीस स्टेशनशी संपर्क केला. शनिवारी सकाळी मी बारामतीला पोलीस स्टेशनला बारामती शाखेचे अंनिसचे कार्यकर्त्या सोबत पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज सोबत कार्यक्रमाची पत्रिका,फोटो दिले. त्याआधीच मुलाचे वडिल,श्री नवनाथ दादा, पत्नी,आजी सोबत छोटा मुलगा काशिनाथ सर्वाना पोलीस स्टेशनमध्ये पोलीसांनी बोलवुन घेतले होते.गेनमाळ बाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली.जावळाचा कार्यक्रम आहे असेही सांगण्यात आले.PI महाडिक सरांनी या कुटुंबाशी चर्चा करून त्यांचे  काय मत आहे याबाबत चर्चा करण्यास सांगितले.
   पोलीस स्टेशनच्या आवारात आम्ही सर्वजण चर्चा करण्यास बसलो तेव्हा त्या कुटुंबाला सर्व गोष्टी समजावुन सांगितल्या.सुरवातीला ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.पण त्यांना बाल संरक्षण हक्क कायदा तसेच  इतर कायद्याबाबत माहीती दिली.गुरूनी सांगितले म्हणुन आम्ही हा विधी करत आहोत.
    ज्या गुरूनी हा विधी करावयास सांगितले होते त्यांच्याशी फोनवर संपर्क केला.फोन स्पिकरवर ठेवुन सर्वासमक्ष  संवाद साधला त्यांना या होणार्‍या छोट्या मुलांचा गेनमाळ करण्याचा सल्ला आपण दिलात.तेव्हा त्यांनी मी या प्रथेच्या विरोधात आहे.हे चुकीचे आहे.या कार्यक्रमाला मी काही कोणाचा गुरू नाही.असे जेव्हा सांगितले तेव्हा नवनाथ दादाच्या कुटुंबांना धक्काच बसला.आपला गुरूच जर हे सर्व नाकारत असेल.तर मग मी तर कशाला हा विधी करू तेव्हा त्यांनी आम्हांला असे आश्वासन दिले,"मुलांचे शिक्षण करीन तसेच त्यांचे देवी बरोबर लग्न लावणार नाही"असे आश्वासन दिले.त्यांचे केस मी देवापुढे नैवेद्य दाखवुन काढुन टाकेन.आम्ही सर्वानी यास संमती दिली कारण आम्ही अंधश्रध्देला विरोध करतो श्रध्देला नाही.
   अडचणीच्या प्रसंगी गुरूनीच पाठ फिरवली होती.याची प्रत्यक्ष जाणीव  झाल्यामुळे मुलाच्या वडिलांनी कोणताच विधी न करण्याचा निर्णय घेतला.
    या विधीसाठी चारशे लोकांना जेवणासाठी आमंत्रण देण्यात आले होते.त्यासाठी होणार्‍या खर्चासाठी कर्ज काढले होते.हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना कित्येक वर्षे कर्ज फेडत बसावे लागले असते.याची जाणीव करून दिली.तेच पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वापरले तर त्यांचा फायदा होईल.नाहीतर आयुष्यभर डोक्यावर कर्जाचा डोंगर घेवुन जगावे लागेल. 
      साधारण दोन ते तीन तासाच्या चर्चेनंतर त्यांच्या मनाची तयारी झाल्यानंतर रीतसर पोलीसांनी जबाब लिहुन घेतले.त्यांच्याही मनातील सर्व शंका कुशंका दुर करण्यास महा.अंनिसचे कार्यकर्ते यशस्वी झाले होते.शिवाय एका छोट्या मुलाची या अनिष्ठ,अघोरी प्रथेतुन मुक्तता....
       यामध्ये पुणे ग्रामीणचे SP अभिनव देशमुख सर,मिलिंद मोहीते सर,बारामती शहर पो.स्टेशनचे PI महाडिक सर तसेच CWC चे बाल संरक्षण अधिकारी परमानंद सर,तसेच गुनवडी गावचे पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे,महा.अंनिसचे बारामती शाखेचे कार्यकर्ते विपुल पाटील,रंगनाथ नेवसे,भारत विठ्ठलदास,हरिभाऊ हिंगसे,दिनेंश आदलिंगे,तुकाराम कांबळे,बाळकृष्ण भापकर,विशाल सरोदे,विकास घाडगे,तुषार जानकर या सर्वाचे मार्गदर्शन तसेच सहकार्यामुळे या 
   प्रथा परंपरांच्या, अंधश्रध्देच्या भितीपोटी  अल्पवयीन मुलामुलीस अवैज्ञानिक विधी करण्यास भाग पाडत आहेत.यामध्ये अनेक बालकांचे शोषण होत आहे.हे थांबवण्यासाठी कायद्याबरोबर या अशिक्षित लोकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
To Top