बारामती ! वाणेवाडी येथील साद संवाद ग्रुपच्या वतीने किल्ले स्पर्धा, गुणवंत विद्यार्थी व कोविड योद्यांचा सन्मान

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
साद संवाद स्वच्छता ग्रुप वाणेवाडी आयोजित किल्ले स्पर्धा २०२१ , कोविड योध्दा सन्मान व गुणवंत विद्यार्थी  गुणगौरव असा कार्यक्रम नुकताच रामराजे जगताप स्मृती भवन येथे उत्साहात पार पडला .
        किल्ले स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून गावातील वाड्यावस्तीवरील लहान मुले मुली , तरुण यांनी जवळपास दिडशे किल्ले बनवले होते . यातील लहान गट , मोठ्या गटातील विविध विजेत्यांना रोख बक्षिसे व विविध भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले . कोविड काळात गावात ज्यांनी सेवा दिली असे डॉक्टर , नर्स , आशासेविका, अंगणवाडी सेविका , आरोग्य कर्मचारी ,ग्रामपंचायत कर्मचारी , सफाई कामगार , तसेच वाणेवाडी ग्रामपंचायत व कोविड सेंटर साठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल रामराजे सोसायटी अशा ३० सत्कारमूर्तींना स्मृतिचिन्ह व देशी झाडाचे रोपटे देऊन गौरविण्यात आले . 
       तसेच हृषिकेश जेधे देशमुख यांना आय आय टी बॉम्बे येथे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या शाखेत प्रवेश मिळाला . असे नेत्रदीपक यश मिळवणारा पहिला बारामतीकर ठरल्याबद्दल त्याचा व पालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला . मनोज दीक्षित गुरुजी यांची नुकतीच पुणे शिक्षक पतसंस्था अध्यक्ष पदी निवड झाली त्यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर  युवराज भोसले यांनी केले . स्वागत रोहित बोत्रे , प्रास्ताविक ज्ञानेश्वर जगताप कार्यक्रमात सुनील भोसले , राजेंद्र जगताप व संदीप जगताप यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर आभार मनोज दिक्षित यांनी मानले.
         या कार्यक्रमासाठी जयवंत भोसले , बाळासाहेब जगताप , दिग्विजय जगताप ,राजेंद्र जगताप, संजयबापू जगताप , रोहित जगताप , नानासो जगताप , संदीप जगताप सर , गोपाळ चव्हाण , दुष्यंत चव्हाण ,adv. नवनाथ भोसले , पत्रकार युवराज खोमणे, नंदकुमार जगताप , धनंजय चौगुले , डॉ .विलास काटकर , डॉ .गणेश जगताप , डॉ. प्रदीप भोसले , डॉ. अमोल जगताप , सरपंच स्मिता काकडे ,  साद संवाद चे सर्व सदस्य तसेच जेष्ठ नागरिक , ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते .
To Top