शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन : १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज पहाटे ५.१० मिनिटांनी त्यांची वयाच्या १०० व्या वर्षी प्राणज्योत मालवली.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं राज्यात शोककळा पसरली आहे.अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. प्रचंड व्यासंग, उत्साहाचा धबधबा असल्याने भव्यदिव्य अन् हिमालयाहून अधिक उंचीचे एकाहून एक सरस असे उपक्रम अखेरच्या महिन्यापर्यंत करणारी प्रेरणाज्योत विझल्याने सह्यगिरीतील गडेकोट अन दऱ्याखोऱ्या मुक्या झाल्या. अखेरपर्यंत म्हणजे कोरोनाची महासाथ सुरू होईपर्यंत व्याख्यानांच्या आणि अन्य कामांच्या निमित्ताने देशा परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते.