ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रिप्लेक्टर बसवून अपघात टाळावेत : पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वर कारखान्याच्या वतीने अपघात टाळण्यासाठी सर्व वाहनांना रिप्लेक्टर देण्याची व्यवस्था करण्यात आली असून 'सोमेश्वर माझा अभिमान माझा' या उपक्रमाअंतर्गत रिप्लेक्टर बसवून स्वतःचा व इतरांचा जीव वाचवावा असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
           सोमेश्वरच्या गाडीतळावर सोमेश्वर माझा अभिमान माझा या अंतर्गत ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर बसण्याची सुरुवात बुधवारी(दि.३) रोजी जगताप यांच्या उपस्थितीत झाली त्यावेळी ते बोलत होते. सोमेश्वर कारखाना आणि वडगाव निंबाळकर पोलिसांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, सोमेश्वरचे ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष शैलेश रासकर, ऋषीकेश गायकवाड, जितेंद्र निगडे, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, सिव्हिल विभागाचे होळकर, अशोक जगताप, अजित जगताप, ऊस वाहतुकदार कैलास मगर आदी यावेळी उपस्थित होते.
          पुरुषोत्तम जगताप पुढे म्हणाले की, कारखाना हंगाम व्यवस्थित सुरु असून आजपर्यंत ५३ हजार मे टनाचे गाळप पूर्ण झाले आहे. बैलगाडी, ट्रक, ट्रक्टर, डंपींग द्वारे ऊसाची वाहतूक सुरू असून सर्व वाहनांना रिप्लेक्टर बसवून अपघात टाळावेत. 

..................
कारवाई करणार - सोमनाथ लांडे, सपोनि वडगाव निंबाळकर 

सोमेश्वर परीसरात ऊसाची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी वाहनांना लाल, पिवळे आणि पांढऱ्या रंगाचे रिप्लेक्टर पुढील आठ दिवसात वाहनांना बसवावेत अन्यथा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.  हंगाम सुरु होताच अपघातांची संख्या वाढत असल्याने सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. 
To Top