जेसीबी चालक ते मालक ग्रामीण भागातील मेहनती युवकाची यशोगाथा
सोमेश्वर रिपोर्टर टीम- - - -
विशेष प्रतिनिधी
दुष्काळाच्या दाहकतेने पोळल्यामुळे आपले आयुष्य दुष्काळी पट्यात गेल्याची जाणीव होती.आपल्या मुलांनी इथं राहून हेच दिवस पाहिला नकोत म्हणून नातेवाईक बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असल्याने त्यांच्या मदतीने वाघळवाडी या ठिकाणी वास्तव्यासाठी भिलारे कुटुंब आले. मुलं शिकली पाहिजेत या उद्देशाने आलेलं भिलारे यांच्या कुटुंबातील तरुण आज जेसीबी चालक ते मालक बनला आहे.इथं म्हणावं लागेल तुम्ही नादच केलाय शेट.... तुमचं कामच हाय लय ग्रेट !
मूळचे सातारा जिल्हातील भिलारे कुटुंब.माणिक भिलारे हे आपल्या कटुंबासह मुलांच्या शिक्षणासाठी वाघळवाडी येथे स्थलांतर करून आले.मुलं शाळेत जाऊ लागली. माणिक भिलारे आणि त्यांची पत्नी मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करून मुलांच्या शिक्षणासाठी वाघळवाडी येथे स्थायिक झाले. पुढे माणिक भिलारे सोमेश्वर कारखान्यात काम करू लागले. नोकरी मिळाल्याने कटुंबाला आधार आला.मुलं शाळेत शिकत होती.
आपल्या पोरानी शिकावं म्हणून गाव सोडून आलेलं कुटुंब मुलांच्या कडून आपली मुलं चांगली शिकली पाहिजेत ही अपेक्षा करत होती. आई-वडील करत असलेल्या कष्टाचे चीज पोरांनी करून दाखवलं. जेष्ठ चिरंजीव सागर यांनी डिप्लोमा पूर्ण करत नोकरी स्विकारली.आणि दुसरे चिरंजीव यांनी दहावीत घवघवीत यश संपादन करत 86 टक्के गुण मिळविले.
पण तुषार ने दहावीत चांगले मार्क मिळवून मावशीकडे जेसीबी शिकण्यासाठी जायचे ठरवले. चार वर्षे मावशी च्या येथे फलटण'ला जेसीबी चालक होण्यासाठी चिकाटीने शिकला.नंतर सोमेश्वर परिसरात चालक म्हणून जवळपास पाच वर्ष काम केलं. आणि आता जेष्ठ बंधू आई -वडील यांच्या मदतीने तुषार आता चालक ते मालक बनला आहे.दहावीत चांगले मार्क मिळवूनही जेसीबी चालवायला शिकतोय हे म्हणले तर अनेकांनी हिणावल. आज तीच हिणावणारी कौतूक करताना दिसतील. याच काळात स्वतःची हक्काची घरा साठी जागा घेतली.घराचे बांधकाम पूर्ण करून घराचे स्वप्न पूर्ण केले.सातत्यपूर्ण काम केलं की यश हमखास मिळतं. याच उदारहण हे तुषार भिलारे हे म्हणावं लागेल. पण हे सगळयांनाच जमत अस नाही. त्यासाठी कष्ट , सातत्य आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशाच्या मागे धावत रहावं लागत...अगदी न थांबता.ते तुषार सारखे....