पुरंदर ! पिसुर्टी येथे महिलेवर बलात्कार प्रकरणी जेजुरी पोलिसात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पिसूर्ती येथे एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी भा.द.वि.कलम 376,506प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की या बाबतची माहिती अशी की पिसूर्टी येथे राहणारे आरोपी शिवाजी उर्फ पिंटू उत्तम बरकडे रा. पिसुर्टी  बोल्हाईचा मळा ता. पुरंदर जि. पुणे याने  दिनांक 29/10/ 2021 रोजी सायंकाळी 3/00 वा.चे सुमारास मौजे पिसुर्टी बोल्हाईचा मळा येथे उसाच्या शेतात पिढीत महिलेवर जबरदस्ती बलात्कार केला.यआसंदर्भात तक्रार  दिनांक 08/11/2021रोजी  साडे चार वाजता जेजुरी पोलिसात देण्यात आले आहे.या बाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसाकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक कुंडलिक  गावडे करीत आहेत.
To Top