सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून बाबुर्डीत मंजूर झालेल्या 2 कोटी 63 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज पार पडला. मोरगाव रोड काळ्या ओढ्यावरील पूल बांधकामासाठी 1 कोटी 42 लाख रुपये, सुपा लोणीभापकर रोड ते शेरेवाडी रस्त्यासाठी 80 लाख रुपये, सुपा-लोणीपाटी रोड ते ग्रामपंचायत कार्यालय रस्त्यासाठी 15 लाख रुपये, बाबुर्डी गावठाण अंगणवाडी, लव्हेवस्ती अंगणवाडी, शेरेवाडी अंगणवाडीसाठी प्रत्येकी 8.50 लाख रुपये, बाबुर्डी स्मशानभूमी सुधारणासाठी 3 लाख रुपये या कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी पुरंदर उपसा सिंचन योजनेतून कऱ्हा नदीवरील बंधारे भरण्यासंदर्भातही चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, जिल्हा परिषद सदस्य भरतनाना खैरे, उपसभापती रोहित कोकरे, बारामती मार्केट कमिटीचे सभापती वसंत गावडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ भोंडवे, सुनिल भगत, प्रणिता खोमणे, बारामती पंचायत समितीच्या सदस्या निता बारवकर, दुध संघाचे संचालक आप्पा शेळके,बारामती मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब पोमणे, तंटामुक्ती अध्यक्ष किरण जगताप,नानासो लडकत, सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, उपसरपंच दिपाली जगताप, ग्रामपंचायत सदस्या, मनीषा बाचकर, अर्चना पोमणे, बाळासाहेब लव्हे, अंकुश लडकत, हौसेराव पोमणे, साहेबराव पोमणे, संतोष पोमणे, राजकुमार लव्हे, गोविंद बाचकर, सागर लव्हे, योगेश जगताप ,लक्ष्मण पोमणे, भानुदास पोमणेआदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी मान्यवरांकडे प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्र, समाजमंदिर आदी विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली.