ॲड.तानाजी शेंडकर यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर :प्रतिनिधी 
   बारामती तालुक्यातील शेंडकर वाडी गावचे जेष्ठ वकिल तानाजी मुगुटराव शेंडकर ( वय ६४ ) वर्ष यांचे मंगळवार  ता ९ नोव्हेंवर रात्री साडेअकरा च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांचे मागे त्यांचा एक विवाहीत मुलगा एक विवाहीत मुलगी पत्नी नातवंडे असा परिवार आहे .
     बारामती न्यायालयात अनेक वर्षापासून त्यानी वकिली केली अतिशय साधे राहणीमान असलेले शांत व सयमी व्यक्तीमत्व म्हणुन ते परिचीत होते .
     त्यांचेवर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करणेत आले . बारामती वकिल संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत सोकटे , ॲड अरविंद  गायकवाड,ॲड शेख ,ॲड खोमणे ,ॲड. गणेश आळंदीकर ,ॲड नवनाथ भोसले  यांचेसह बारामती चे अनेक वकिल  यावेळी हजर होते .ॲड अरविंद गायकवाड यांचे वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली .
    शेंडकर वाडी ग्रामस्थाच्या वतीने रुपचंद गायकवाड यानी श्रद्धांजली अर्पण केली .त्यांच्या निधनामुळे बुधवारी बारामती न्यायालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आलेची माहीती वकिल संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत सोकटे यानी दिली .
To Top