भोर ! नेरे परिसरात बिबट्या कॅमेऱ्यात कैद : नागरिकांच्यात भीतीचे वातावरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---    
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील नेरे ता.भोर परिसरात मागील महिनाभरापासून बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण आहे.तर शेतीची कामे चालू असतानाही नागरिक बिबट्याच्या भीतीने घरातच बसून आहेत.                                                        मागील आठवड्यात नेरे परिसरातील पाले व वरवडी येथे बिबट्याने १ शेळी,१ बकरे मारल्याने व ३ शेळ्या जखमी केल्याने परिसरात नागरिक घाबरून गेले आहेत.बिबट्याने हल्ला केल्याच्या दोन घटना ताज्या असतानाच मंगळवार दि-९ सायंकाळी सातच्या दरम्याम वाहन चालकांना बिबट्याने नेरे-पाले रस्त्यावर दर्शन दिल्याने वाहन चालकांची पळता भुई थोडी झाली.वनविभागाणे सुस्त न राहता गांभीर्याने घेऊन योग्य त्या उपाय योजना आखाव्यात अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.


     
To Top