सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव बारामती रस्त्यावरील तरडोली नजीक शेरेमळा येथे आज दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असल्याची घटना घडली . म्रूत्यु पावलेली व्यक्तीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला प्रमेश अनिल साळवे हा तरुण माळशिरस येथील रहीवाशी होता .
जेजुरी ते बारामती या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक असून पुण्याला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे . यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते . मात्र रस्ता रुंदीकरणामुळे व नव्याने बनविलेल्या डांबरीकरणामुळे वाहनचालक जणू वेगाचा लगाम विसरुन गेले आहेत . गेल्या आठ दिवसात या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी तीन व्यक्ती मृत्यू पावल्या असल्याच्या घटना घडल्या आहेत . गेल्या आठ दिवसापूर्वी झालेल्या अपघातात लोणी भापकर येथील जखमी झालेल्या अमर दत्तात्रय कांबळे वय ४० वर्षे यांचा काल दि . १० ऱोजी मृत्यू झाला . तर काल दि . ९ रोजी मध्यरात्री तरडोली नजीक मामाचा मळा येथे झालेल्या अपघातात चारचाकी गाडीतील मध्यमवयीन व्यक्ती जागीच मृत्यू पावली .
तर आज तरडोली या गावच्या हद्दीत शेरेमळा येथे दुचाकी स्वराचा ( दुचाकी गाडी क्र .एम . एच १२ सी . ई . ४५०७ ) अपघात झाला यामध्ये हा तरुण जागीच मृत्यू पावला . घटनेची माहीती समजताच पोलीस हवलदार वसंत वाघोले , सुशांत पिसाळ , पोलीस शिपाई तुषार जैनक यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा नोंदविला .
...........................................................