बारामती ! शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयास परवानगी : भरली जाणार ३९४ पदे
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
येथील नव्याने सुरु होणा-या 100 विद्यार्थी क्षमतेच्या - शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय व संलग्नित 100 बेडच्या शासकीय आयुर्वेदीक रुग्णालयासाठी 394 पदे निर्माण करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली. या बाबतचा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार बारामतीतील शासकीय आयुर्वेद महाविद्याल व संलग्नित रुग्णालय निर्मितीस मान्यता देण्यात आली असून सन 2022-2023 पासून हे महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. या मध्ये 230 पदे नियमित स्वरुपात निर्मित करण्यात आली असून 164 पदांची सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.