सोमेश्वर रिपोर्टर टीम------
साई सेवा मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल अँड आय सी यू चा प्रथम वर्धापनदिन नुकताच पार पडला.
वर्धापनदिनी रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि सर्व प्रतिष्ठित व सामाजिक आरोग्यसेवक यांनी उपस्थिती दर्शवित कार्यक्रमाची शोभा वाढवली , हॉस्पिटल चे सर्व सहकारी, डॉक्टर , स्टाफ यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला
तसेच वर्धापदिनानिमित्त घेतलेल्या मोफत शिबिरासाठी भरभरून प्रतिसाद मिळाला आणि हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतला.
यावेळी बोलताना डॉ. विद्यानंद भिलारे म्हणाले, आपण प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने दिलेल्या शुभेच्छा यांचा आम्ही स्वीकार करत आहोत तसेच वाढलेली जबादरी मुळे आम्ही मनापासून अतोनात प्रामाणिक व यशस्वी सेवा देण्याचा प्रयत्न करू तसेच प्रथम वर्ष हॉस्पिटल चे आपल्या सेवेत कसे गेले कळलेच नाही कोरोना रुग्णांची सेवा, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, थायरॉईड, दमा, किडनी, मुतखडा, अर्धांगवायू , विषबाधा , सर्पदंश,डेंग्यू, आणि विविध तापाचे विकारांपासून ते ऑपरेशन मधील फ्रॅक्चर, पोटाचे विकार, स्त्रीरोग, मेंदू - मणक्याचे ऑपरेशन सर्व काही एकाच छताखाली ऐकाच वर्षामध्ये सेवा देण्याचं भाग्य आम्हास मिळाले .
ग्रामीण भागामध्ये अतिशय दर्जेदार असे सिटी स्कॅन , सोनोग्राफी , स्ट्रेस टेस्ट , अत्याधुनिक पथोलॉजी लॅब , डिजिटल एक्स रे या सर्व सुविधा ऐकाच छताखाली अत्यल्प दरात देण्याचा प्रयत्न केला व तरीही अजून आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा आम्ही आपल्या भागामध्ये देण्यासाठी प्रयत्नशील राहू.
नवीन सुविधा,
-कॅशलेस सुविधा उपलब्ध
-हॉस्पिटल मध्ये सर्व तज्ञांच्या भेटी उपलब्ध आहेत
-सांधेबदल शस्त्रक्रिया
-मेंदू मणक्याच्या शस्त्रक्रिया
- साई सेवा स्पेशालिटी क्लिनिक साखरवाडी
आपले नम्र,
डॉ विद्यानंद मा भिलारे MD med KC CDM-UK
डॉ राहुल ए शिंगटे Managing Director
डॉ शुभम शाह
MBBS D Ortho
साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय सी यू
COMMENTS