बारामती दि २५
बारामती तालुक्यात वाहनांच्या बॅटरी चोरी प्रकरणी पणदरे व ढाकाळे परिसरातील चौघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळून आहेत.
बारामती तालुक्यात वाहनांच्या बॅटरीचे चोरीचे प्रमाण वाढले होते,त्या अनुषंगाने बारामती विभागात स्थनिक गुन्हे शाखेने पेट्रोलिंग सुरू केले असता,वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी ही ढाकाळे आणि पणदरे सक्रिय असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता, माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ ढाकाळे आणि पणदरे येथे जात चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता,चौघांनी बारामती परिसरात रस्त्यालगत पार्किंग केलेल्या अनेक ट्रक किंवा अवजड वाहनांच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे कबूल केले.याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपींना तपासाकामी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,सहाय्यक फौजदार अनिल काळे,पोलीस हवालदार रविराज कोकरे,अजय घुले,विजय कांचन,अभिजित एकशिंगे,पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे,पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव,सहा.फो काशीनाथ राजापुरे यांनी केली आहे.