बारामती ! बाबुर्डी येथे सुपे-लोणीभापकर रस्त्यावर गाडी घसरून एकजण गंभीर जखमी : उपचारासाठी बारामती येथे दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
काळखैरेवाडी ते लोणीभापकर या रस्त्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. रस्त्यावर खडी टाकल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे पुढून वाहन आल्याने दुचाकीवाला खडीच्या ढिगाऱ्यावरून घसरून गंभीर जखमी झाला.
            हा रस्ता शिरूर-सुपे-सांगवी राज्यमार्ग असल्याने रस्त्यावर मोठया गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. काळखैरेवाडी येथे तर रस्त्याचे मुरुमीकरण करून दोन महिने उलटून गेले आहेत पण अद्यापही रस्त्याचे काम चालू झाले नाही. या ठिकाणी गाड्यांच्या आवक जावकने तेथे फुफाट्याने तर दिवसाही काही दिसत नाही. रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजिबात लक्ष नसल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी मत व्यक्त केले. सदर अपघातग्रस्त व्यक्तीला बाबुर्डीतील नागरिकांनी 108 नंबरला फोन करून ऍम्ब्युलन्सने बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली दवाखान्यात पाठवले. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी बाबुर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे आणि राजकुमार लव्हे यांनी केली.
To Top