सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मांडवगण फराटा :प्रतिनिधी
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे गुरुवारी (ता. १८) घडलेल्या दुर्घटनेतील समीर भिवाजी तावरे (वय ३५ ) याचा आज (शनिवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी औषध घेतल्यानंतर अत्यावस्थेत त्याला दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वी घरगुती भांडणातून समीर तावरे याची बहिण माया सोपान सातव (वय ३२) हिने विहिरीत आत्महत्या केली होती. बहिणीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर समीरने स्वतः ची पत्नी वैशाली तावरे (वय २८ ) हिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून केला होता. त्यानंतर स्वतःला संपवण्यासाठी तो देखील विषारी औषध प्यायला होता. समीर याच्या मागे वडील, आई, ११ वर्षांचा मुलगा, ७ वर्षांची मुलगी असा परिवार आहे
COMMENTS