सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखाने १०० रुपये बाकी वाढवून देण्यास काही हरकत नव्हती याबाबत मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती त्यांनी ही याबाबत साखर आयुक्तालयाला फोन करून माहिती घेऊन निर्णय घेण्यास सांगितले होते परंतु याचे श्रेय इतरांना मिळू नये म्हणून शंभर रुपये वाढीव बिल दिले नाही तसेच येत्या गळीत हंगामामध्ये एफआरपी एका रकमेने देण्यात यावी याबाबत कारखान्याने जर एफआरपीचे तुकडे केले तर शेतकरी कृती समितीच्या वतीने आंदोलन करत व गव्हाण बंद करण्याचा इशारा शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला आहे.
वाणेवाडी (मळशी) ता बारामती येथे जोतिबा वि का सहकारी सोसायटी संस्थेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे ,उद्योजक राजेंद्र जगताप, रामराजे सोसायटीचे अध्यक्ष बाळासो जगताप, सोमेश्वर चे माजी संचालक पी के जगताप उपस्थित होते. तसेच सोमेश्वर चे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे हे संस्थेला भेट देत संस्थेला शुभेच्छा दिल्या
यावेळी प्रमोद काकडे भाषणात म्हणाले की संस्था चांगल्या प्रकारे काम करीत असून प्रगतिपथावर आहे संस्थेचे आर्थिक परिस्थिती चांगली असून उत्तरोत्तर प्रगती करीत राहू अशा सदिच्छा दिल्या.
उद्योजक राजेंद्र बापू जगताप म्हणाले की रामराजे सोसायटी व ज्योतिबा सोसायटी ही आमचीच असून एकाच घरातील आहे असे सांगून त्यांनी दोन्ही संस्थांचा गौरव केला. यावेळी नवनिर्वाचित संचालक अभिजित काकडे व ऋषिकेश गायकवाड यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी हा सत्कार केला. तसेच काही सभासदांना संस्थेच्या वतीने पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक ब्लँकेट रजाई भेट देण्यात आली. व ९ टक्के लाभांश वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे संस्थापकांपैकी एक गणपतराव जगताप यांचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेच्यावतीने गणेशमूर्ती देऊन करण्यात आला तसेच तानाजी जगताप यांचा संस्थेला ऑफिस उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव धन्यकुमार जगताप यांनी केले तर आभार स्वप्निल काकडे यांनी मानले.
COMMENTS