सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आणि गावाला पाणी मिळणार नाही असे सरपंच यांना समजताच...मंग काय सरपंच यांनी स्वतः खोरं आणि टिकाऊ घेऊन पाईपलाईन जोडली. आणि गावाचा पाणीपुरवठा सुरळीत झाला.
नाझरे प्रादेशिक योजनेतून बाबुर्डी गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी येणारी पाइपलाइन ही गावातील साठवण टाकीजवळ फुटली आहे आणी रात्री दहा वाजता पाणी येणार आहे. मात्र पाइपलाइन फुटल्याने गावातील आज टाकी भरणार नाही. आणि ग्रामस्थांना पाणी मिळणार नाही असा निरोप रात्री ९ वाजता बाबुर्डी पाणीपुरवठा कर्मचारी मोहन जगताप यांनी बाबूर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांना दिला. निरोप मिळाला की लगेच सरपंच हे स्वतः खोरं आणी खोदण्यासाठी टीकाऊ घेऊन पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणी गेले आणी आपल्या सहकारी यांच्या मदतीने पाइपलाइन फुटलेल्या ठिकाणी खोदकाम करून पाइपलाइन दुरुस्ती करून दिली. गावांसाठी एवढ्या तळमळीने काम करणारा सरपंच गावाने पहिल्यांदाच बघीतला गावासाठी आपल्या पदाचा गर्व न करता स्वतः गावासाठी झटणारा सरपंच गावाने पहिला. यावेळी सरपंच यांना राजकुमार लव्हे, सूरज काळोखे, धनजंय लव्हे, सूरज लव्हे तसेच मोहन जगताप यांनी सहकार्य केले