राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडून
जाधवराव कुटुंबीयांचे सांत्वन
सोमेश्वर रिपोर्टर टीम --------
पुरंदर
माजी कृषी व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री दादासाहेब (सुरसिंह) जाधवराव यांच्या पत्नी व युवानेते बाबाराजे जाधवराव यांच्या मातोश्री दमयंतीदेवी (मॉसाहेब) जाधवराव (वय ८२) यांचे रविवार दि.३१ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी जाधववाडी येथे विधिवत संपन्न झाला. यावेळी अथांग जनसागर लोटला होता. खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, जालिंदर कामठे, दिलीप यादव आदींसह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.
मंगळवार दि. २ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री , सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण,वने, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय
राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी सपत्नीक जाधववाडी (ता.पुरंदर) येथे
जाधवराव कुटुंबीयांची भेट घेतली. जाधवराव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होऊन सांत्वन केले. या वेळी दत्ता मामा भरणे यांनी सपत्नीक दमयंतीदेवी (माँसाहेब) जाधवराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
COMMENTS