सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा (ता. पुरंदर) येथील ज्युबिलंट कामगार युनियनचे माजी उपाध्यक्ष रमेश पांडुरंग जेधे यांना राष्ट्रीय श्रमिक आघाडी या कामगार संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
जेधे हे मागील पंचवीस वर्ष ज्युबिलंट कंपनीतील कामगार संघटनेमध्ये कार्यरत आहेत. या संघटनेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. याशिवाय सध्या जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांशी संपर्कात आहेत. यामुळे १७३ कामगार संघटनांची शिखर संस्था असलेल्या राष्ट्रीय श्रमीक आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदावर त्यांची वर्णी लागली. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे राज्याचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या हस्ते नुकतेच त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. जेधे यांचे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण, रेवन गायकवाड, बाळासाहेब बारवकर, अनिल कोंडे, शिवाजी लोखंडे, संजय कदम, दिलीप अडसूळ यांनी अभिनंदन केले.
--
COMMENTS