सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक : उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे, दि.२७
जिल्ह्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने येत्या 1 डिसेंबरपासून कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी आणि चित्रपटगृह तसेच नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षक क्षमतेलाही परवानगी देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

.पवार म्हणाले, राज्यातील कोविड परिस्थीती नियंत्रणात असल्याने 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात येईल. मात्र कोविडचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसल्याने नागरिकांना मास्क घालणे आणि कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. जगातील इतर देशात पसरणाऱ्या नव्या कोविड व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्यात यावी.

कोविड लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांनाच विमान प्रवासाची अनुमती असल्याने देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पुणे  विमानतळावर तपासणी करण्यात येऊ नये. नवा व्हेरीयंट आढळलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात येईल. नुकतेच झालेले सण-उत्सव आणि नव्या व्हेरियंटचा धोका पाहता जम्बो कोविड हॉस्पिटलबाबत डिसेंबरअखेर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

लस न घेणाऱ्या नागरिकांच्या प्रबोधनावर भर द्यावा. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना टाळण्यासाठी व आपत्कालीन परिस्थीतीत तातडीने कार्यवाही करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण द्यावे, असेही श्री.पवार म्हणाले.

विभागीय आयुक्त श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्याने कोविड लसीकरणाचा 1 कोटी 30  लक्षचा टप्पा पार केला असून लसीरणात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 431 गावात 100 टक्के पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  लसीकरणात वाढ झाल्याने रुग्णसंख्या व मृत्यूच्या संख्येत घट झालेली आहे. 97 टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा तर 62 टक्के नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 1.6 पर्यंत कमी झाला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस आमदार सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल, दिलीप मोहिते, अशोक पवार, सुनिल कांबळे, पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

Name

blogg,2,braking news,1,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,4298,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक : उपमुख्यमंत्री अजित पवार
कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक : उपमुख्यमंत्री अजित पवार
https://lh3.googleusercontent.com/-eyWgOH9Kmz4/YaJQGlgoEKI/AAAAAAAADmo/Jwj2Uz-vk7kjA94OIgKelJ-nOyf-wqczgCLcBGAsYHQ/s1600/1638027270167218-0.png
https://lh3.googleusercontent.com/-eyWgOH9Kmz4/YaJQGlgoEKI/AAAAAAAADmo/Jwj2Uz-vk7kjA94OIgKelJ-nOyf-wqczgCLcBGAsYHQ/s72-c/1638027270167218-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/11/blog-post_686.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/11/blog-post_686.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy